Ad will apear here
Next
बावधन येथे पतंगोत्सव उत्साहात
पुणे : गोयल गंगा फाउंडेशनकडून बावधन येथील गंगा लेजंड येथे पतांगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  

यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसह लहान मुले, महिला, वयोवृद्धांनीही पतंगोत्सवाचा आनंद लुटला. कुटुंबासमवेत बहुरंगी पतंग उडविण्यात सर्वजण दंग झालेले पहायला मिळाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गंगा लेजंड येथे दीड वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ‘गंगा अथ’ ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली.

‘गोयल गंगा’चे विश्वस्त जयप्रकाश गोयल म्हणाले, ‘आज एकीकडे समाजात जात, पात, वर्ण अशा मतभेदातून नकारात्मक संदेश जात आहे. असे असताना आपल्याला लाभलेली सणांची संस्कृती ही यावर मात करण्याची मोठी ताकद आहे. आज या सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण माणुसकीच्या भावनेने एकत्र आलो. यातूनच मानवतेचा सकारात्मक संदेश जातो. आनंदासाठी, एकोप्यासाठी असे सण-उत्सव एकत्र साजरा करण्यावर आमचा भर असतो.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZQGBK
Similar Posts
‘संस्काराशिवाय जीवन म्हणजे भरकटलेले जहाज’ पुणे : जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो.
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलला पुरस्कार पुणे : गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलला ‘ग्लोबल इनोव्हेटिव्ह स्कूल अवॉर्ड २०१८’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘गृहिणी असणे हा नोकरीपेक्षाही उच्च सन्मान’ पुणे : ‘महिला दिन खरेतर एक दिवसाचा नसून तो वर्षभर साजरा केला पाहिजे. ज्या माध्यमातून महिला शक्ती व महिलांचा सन्मान सातत्याने घडवून आणणे आवश्यक आहे. ‘गृहिणी’ घरात पूर्णवेळ राबत असते. मुलांचे संगोपन, घरातील व्यवहार, मुलांवर संस्कार अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते. त्यामुळेच ‘गृहिणी’ असणे हा नोकरीपेक्षाही
‘गोयल गंगा’तर्फे वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वाटप पुणे : ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता आपले काम चोखपणे पार पाडणाऱ्या वाहतूक पोलिसांना त्यांच्या कामात त्यांना हातभार लागावा या हेतूने गोयल गंगा फाउंडेशनतर्फे बंड गार्डन येथे फाउंडेशनचे विश्वस्त अमित गोयल यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language